मुसळे विद्यामंदिरात लाठीकाठी शिबिर

मुसळे विद्यामंदिरात लाठीकाठी शिबिर

ich72.jpg
95404
इचलकरंजी : लाठीकाठी शिबिरातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मुसळे विद्यामंदिरात
लाठीकाठी शिबिर
इचलकरंजी : तात्यासाहेब मुसळे बाल विद्यामंदिरात लाठीकाठी शिबिर घेण्यात आले. रोटरी क्लब, गॅलेक्सी फाउंडेशन, योद्धा ॲकॅडमीतर्फे शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात पहिली ते चौथीच्या ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी लाठीकाठी प्रात्यक्षिक सादर केले. चंद्रशेखर पोर प्रमुख पाहुणे, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे होते. उत्कृष्ट विद्यार्थ्यांना किट व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवले. ओंकार हुपरे यांनी प्रशिक्षणाचे काम पाहिले.
----
ich73.jpg
95405
इचलकरंजी : नागेंद्र रंगरेज यांच्या हस्ते युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
फिनिक्स इन्फोटेकतर्फे पुरस्कार प्रदान
इचलकरंजी : येथील फिनिक्स इन्फोटेकने २४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने वार्षिक स्नेहसंमेलन आणि युवा गौरव पुरस्कार २०२४ सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन, लावणी, क्लासिकल डान्स, साउथ डान्स, देशभक्तीपर गाणी यांचे सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी अभिजित होगाडे होते. फिनिक्स इन्फोटेक संस्थेचे संस्थापक नागेंद्र रंगरेज आणि अर्जुन रंगरेज यांनी मनोगत व्यक्त केले. ट्रेनरनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबदल शिल्ड देऊ सत्कार केला. फिनिक्समध्ये ट्रेनिंग घेऊन व्यावसायिक झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. युवा उद्योजक चोपडे टेक्स्टाईलचे नितीन चोपडे, कटारे हार्डवेअर आणि कटारे हॉलचे कृष्णा कटारे, केशव काँक्रिट वर्क्सचे अनिल निकम यांना फिनिक्स युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. अक्षय पवार, आकाश दळवी, गीता रंगरेज, प्रियांका रंगरेज, संतोष बाकळे, चेतना बाकळे उपस्थित होते.
------
ich74.jpg
95406
इचलकरंजी :डीकेएएससी महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्‍घाटनप्रसंगी प्राचार्य एस. एम. मणेर यांनी मार्गदर्शन केले.
‘डीकेएएससी’मध्ये प्राध्यापक प्रबोधिनी
इचलकरंजी : ‘अठरापगड जातीच्या मुलांची वसतिगृहे, राधानगरी धरण, शाहू मिल ही शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची स्मारके आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाचे जगणे त्यांच्या वाट्याला यावे यासाठी शाहूंनी केलेले कार्य आभाळा एवढे मोठे आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य. एस. एम. मणेर यांनी केले. डीकेएएससी महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष व प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्‍घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ. डी. सी. कांबळे उपस्थित होते. प्रा. संजय सुतार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रोहित शिंगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. ए. यादव यांनी आभार मानले.
-------
ich75.jpg
95407
इचलकरंजी : श्री व्यंकटेश महाविद्यालयात वार्षिक अंक व सहामाही वार्तापत्राचे प्रकाशन केले.
‘व्यंकटेश’मध्ये वार्षिक अंकाचे प्रकाशन
इचलकरंजी : श्री व्यंकटेश महाविद्यालयात वार्षिक अंक ''मदनामृत'' व सहामाही वार्तापत्र ‘व्यंकटेश बुलेटीन’चे प्रकाशन केले. यानिमित्त छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची समकालीनता, या विषयावर समाज प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वाङ्‌मय मंडळातर्फे आयोजन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने होते. संस्थेचे सदस्य महेश बांदवलकर, प्रा. अमिन बाणदार यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रमुख डॉ. एस. एन. जरंडीकर यांनी करून दिली. प्रा. डॉ. एस. आर. ठाकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. डी. एस. कांबळे यांनी आभार मानले.
---
ich76.jpg
95408
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात नवीन सॉफ्टवेअरच्या उद्‍घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. त्रिशला कदम यांचे स्वागत प्रा. संगीता पाटील यांनी केले.

कन्या महाविद्यालयात नवीन सॉफ्टवेअर
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने कोहा या नवीन सॉफ्टवेअरचे उद्‍घाटन झाले. प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम म्हणाल्या, ‘आधुनिक जगाशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे, ही काळाची गरज आहे.’ ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. मिनाज नायकवडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. संगीता पाटील यांनी आभार मानले.
-------
ich77.jpg
95409
इचलकरंजी : शहरस्तरीय समूहगीत स्पर्धेत माई बाल विद्यामंदिरने प्रथम क्रमांक प्राप्त केले.
माई बाल विद्यामंदिर प्रथम
इचलकरंजी : शहरस्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत माई बाल विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीतास प्रथम क्रमांक मिळाला. अनंतराव भिडे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शैला कांबरे, संगीत शिक्षक दिनकर भिउंगडे, मीना तोसनीवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
----
विद्यार्थ्यांची दंत तपासणी
इचलकरंजी : डीकेटीई संस्थेच्या इंटरनॅशनल स्कूल तारदाळ शाखेत विद्यार्थ्यांचे मोफत दंत तपासणी व वृक्षारोपण केले. डॉ स्नेहल सावगावे, डॉ. चिराग शारदा व डॉ. गायत्री खटावकर यांनी तपासणी केली. मौखिक आरोग्य राखण्यास विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. शाळेच्या परिसरात ९४ वृक्षांची लागवड केली. रेवती आवाडे, मुख्याध्यापिका माला सूद, उपमुख्याध्यापक संदीप नेजकर आदी उपस्थित होते.
------------------
‘बालाजी’मध्ये विद्यार्थी निवडणुका
इचलकरंजी : श्री बालाजी विद्यामंदिरमध्ये विद्यार्थी निवडणुका झाल्या. दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांमधून शालेय प्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधी निवडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीचे आयोजन केले. विद्यार्थी प्रतिनिधी, उमेदवार, कार्यकर्ते, निवडणूक अधिकारी, प्रचार कार्य, मतमोजणी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन प्रत्यक्ष निवडप्रक्रिया राबवली. मुख्याध्यापिका निशा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com