डेफ स्कूलमध्ये निवडणूक

डेफ स्कूलमध्ये निवडणूक

डेफ स्कूलमध्ये
निवडणूक
इचलकरंजी : रोटरी क्लब इचलकरंजी डेफ स्कूल तिळवणी या विद्यालयात या वर्षाची विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक झाली. विद्यार्थिनी प्रतिनिधी शशिकला गावडे तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आयुषकुमार महतो यांची निवड झाली. उपप्रतिनिधी म्हणून बोरम्मा येळमेली, जतीन चौधरी निवडून आले. यासाठी मुख्याध्यापिका स्मिता रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजक म्हणून सुहास गायकवाड यांनी काम पाहिले. मुलांना साईन दुभाषकाचे काम सौ. मानसी ठाकूर यांनी केले. आभार रूपाली सलगर यांनी मानले.
-----
नौदलातील
संधीवर व्याख्यान
इचलकरंजी : डीकेटीई कॉमर्स कॉलेजतर्फे भारतीय नौदलातील संधी या विषयावर व्याख्यान झाले. नेव्हल दलातील लेफ्टनंट कौस्तुभ पाटील यांनी व्याख्यानात संरक्षण दलातील उपलब्ध असणाऱ्या विविध संधी याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी याबाबत विचार करावा, असे आवाहन केले. दीपाली पाटील, डी. के. टी. ई. संस्थेचे शैक्षणिक समुपदेशक अशोक केसरकर, विभागप्रमुख प्रा. खानाज उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक सावंत यांनी केले.
----
इनरव्हील क्लबचे
इचलकरंजीत पदग्रहण
इचलकरंजी : इनरव्हील क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात झाला. अध्यक्षपदी चंदा कोठारी, सचिवपदी प्रेमलता सारडा व खजिनदारपदी अर्चना मानधने यांची निवड केली. शपथग्रहण सोहळा इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७च्या असोसिएशन कौन्सिल मेंबर वैशाली लोखंडे यांच्या हस्ते झाला. मावळत्या अध्यक्षा श्रद्धा झंवर व सचिव आशा छापरवाल यांनी वर्षभरामध्ये राबवलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देऊन नूतन पदाधिकाऱ्यांकडे धुरा सोपवली. गरजू महिलेस शिलाई मशीन, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पाहुण्यांच्या हस्ते केले. स्वागत श्रद्धा झंवर यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा मराठे, मीनाक्षी तंगडी यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com