सरकारी योजनांची ग्रामस्थांना मिळणार माहिती

सरकारी योजनांची ग्रामस्थांना मिळणार माहिती

09128
इचलकरंजी : श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमात डी. के. गोर्डे-पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सरकारी योजनांची ग्रामस्थांना मिळणार माहिती
डी. के. गोर्डे-पाटील : ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण, प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ११ : समाजाने मदतीची तत्परता विसरली असून, त्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा ताकदीने उभी राहिली आहे. आता चोरी दरोड्याच्या घटनेत आता चोर तत्काळ जेरबंद होणार आहेत. ग्रामसभा, सरकारी योजनांची ग्रामस्थांना तत्काळ माहिती मिळणार आहे. प्रत्येक नागरिकाने या यंत्रणेशी जोडावे, असे आवाहन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे-पाटील यांनी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेतर्फे इचलकरंजी, शहापूर, शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी पोलिस स्टेशन हद्दीत संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार आहे. यामुळे गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार असल्याचे सांगितले. नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले.
अतिशय महत्त्‍वपूर्ण यंत्रणेचा गावामध्ये अलर्ट राहून प्रभावीपणे वापर करावा. आपले गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी विक्रमसिंह घाटगे, बाजीराव पोवार, प्रकाश पुजारी, शशिकांत ढोणे, आदी उपस्थित होते.
--------
ग्रामपंचायतींसाठी विशेष तरतूद
ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलिस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी ५० रुपये प्रतिकुटुंब, प्रतिवर्ष खर्च येणार आहे. या खर्चाची पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना दिले आहेत. याची विस्तृत माहिती देऊन ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com