खंडणी आरोपींना फिरव१ले

खंडणी आरोपींना फिरव१ले
Published on

कोयत्याच्या धाकाने दहशत
माजवणाऱ्या सहाजणांना फिरवले

12740

इचलकरंजी, ता. १५ : मंगळवार पेठ परिसरात कोयते नाचवत दहशत माजवणाऱ्या टोळक्याच्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. अटकेतील उम्याभाई ऊर्फ उमेश आरबोळे टोळीतील सहा आरोपींना आज सायंकाळी घटनास्थळी नेऊन फिरवण्यात आले. यावेळी संशयित आरोपींकडून संपूर्ण घटनाक्रम उलगडून घेतला.यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या प्रकरणात खंडणीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला व वाहनांची तोडफोड झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या टोळीप्रमुख उमेश आरबोळे , योगेश बडोदेकर, मोहीन जमादार, वैभव कोरवी , शिवराज चनविरे, ओमकार काजवे या आरोपींना निरामय रिंग रोडवरील शांतीनाथ शाळा परिसर तसेच मंगळवार पेठ परिसरात नेऊन नेमका हल्ला कसा केला, कोणत्या ठिकाणी मारहाण झाली आणि वाहनांची तोडफोड कशा पद्धतीने करण्यात आली याबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली.
पोलिसांनी आरोपींकडून कोयते व दगडांचा वापर करून केलेल्या हल्ल्याचा क्रम समजून घेतला. तसेच आरोपींनी दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे दहशत माजवली, याचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. दरम्यान तपास पथकाने यावेळी घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांची माहिती आणि आरोपींची कबुली यामध्ये ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती. कोयते नाचवत दहशत माजवणाऱ्या आरोपींना प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com