नॅनो तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅनो तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज
नॅनो तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज

नॅनो तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज

sakal_logo
By

04570
अतिग्रे : संशोधनासंबंधी संजय घोडावत विद्यापीठाने सी-मेट पुणे बरोबर सामंजस्य करार करताना मान्यवर.
----------
नॅनो तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज
डॉ. भरत काळे; घोडावत विद्यापिठात राष्ट्रीय चर्चासत्र
जयसिंगपूर, ता.१: भारताच्या शाश्वत विकासासाठी सध्या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. ऊर्जा निर्माण व साठवण, बॅटरी, सुपरकॅपॅसिटर, गॅस सेंसिंग अशा सर्वच क्षेत्रात प्रभावी नॅनो पदार्थांचा वापर करून वैज्ञानिकांनी नॅनोक्रांती घडवून आणली आहे, असे प्रतिपादन सी-मेट, पुणेचे संचालक डॉ. भरत काळे यांनी केले.
घोडावत विद्यापीठ आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी घोडावत विद्यापीठ व सी-मेट यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. तसेच विद्यापीठाने सुरु केलेल्या ‘सेंटर फॉर रिनीवेबल एनर्जी अँड ऍडव्हान्स मटेरियल’ (क्रीम) या संशोधन केंद्राचे उद्‍घाटन डॉ. भरत काळे आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांच्याहस्ते केले. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व त्यांना सर्वगुण संपन्न बनवण्यासाठी लागणारी सर्व जीवनकौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले व विद्यापीठाचा प्रगतीचा आलेख विशद केला. चर्चासत्रात सी-मेटचे संचालक डॉ. भरत काळे, क्वीनसलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ऑस्ट्रेलियाचे संशोधक प्रा. दीपक डूबल, युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स ऑस्ट्रेलियाचे डॉ. महेश सूर्यवंशी, डोंगूक युनिव्हर्सिटी साउथ कोरियाचे डॉ. चिन्ना डी. बाथूला यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. चर्चासत्रासाठी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समन्वयक डॉ. संभाजी पवार यांनी प्रास्ताविक केले.