ओढ्यावरील पुलासाठी साडेपाच कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओढ्यावरील पुलासाठी साडेपाच कोटी
ओढ्यावरील पुलासाठी साडेपाच कोटी

ओढ्यावरील पुलासाठी साडेपाच कोटी

sakal_logo
By

फोटो देत आहे
-----------------
ओढ्यावरील पुलासाठी साडेपाच कोटी
जयसिंगपूर रेल्वे स्टेशन- उदगाव मार्ग; प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात
जयसिंगपूर, ता. ११: मोठा पाऊस अथवा पुरात पाणी येऊन वाहतुक ठप्प होणारा उदगाव-जयसिंगपूर रेल्वे स्टेशन मार्गावरील ओढ्याच्या पुलासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यातून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. निविदा निघाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
अनेक वर्षापासून उदगाव-जयसिंगपूर रेल्वे स्टेशन मार्गावरील असलेल्या मोठ्या ओढ्यावरील मार्गावर पूल व्हावा, अशी मागणी होती. यासाठी आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून या पुलासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. अखेर आता अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली असून प्रत्यक्षात निविदा निघाली असल्याने हा महत्त्‍वाचा मार्ग सोयीचा होणार आहे.
कवठेसार, दानोळी, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिरटी ते शिरोळ असा मार्ग आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते उदगाव मार्गावर एक मोठा ओढा असून मोठा पूर किंवा मोठा पाऊस झाला तरी या ओढ्यावर पाणी येऊन वाहतुकीसाठी हा मार्ग बंद होतो. शिवाय उदगाव येथील सांगली-कोल्हापूर महामार्गापासून ओढ्यामुळे उतरती असून ओढा संपताच उंच भाग आहे. त्यामुळे वाहनाचा अंदाज न आल्याने सातत्याने अपघाताही होत होते. जयसिंगपुरातील नागरिकांना सांगली-मिरजेकडे जायचे झाल्यास हा मार्ग अंत्यत जवळचा आहे. पावसाळ्यात सातत्याने पाणी आल्याने रस्ता बंद राहत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतर आमदार यड्रावकर यांनी येथे पूल उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर या पुलासाठी पाच कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. अखेर त्यांची निविदा निघाली असून आता पूल उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याने पुलाची मागणी पूर्ण होणार आहे.
....
सर्वांच्या सोयीचा मार्ग
उदगाव, चिंचवाड, शिरोळ, अर्जुनवाड यांसह नागरिकांना जयसिंगपूर रेल्वे स्टेशन येथे येण्यासाठी जयसिंगपूर शहरात न जाता थेट उदगावहून रेल्वे स्टेशन येथे जाता येते. शिवाय सांगली येथील अनेक प्रवासी जयसिंगपूर रेल्वे स्थानकातून कोल्हापूरसाठी प्रवाशासाठी जात असतात त्यामुळे हा मार्ग सर्वांच्या सोयीचा आहे. त्यामुळे आता पूर किंवा पावसाचे पाणी आल्यास पूल पाण्याखाली जाणार नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला गती मिळणार आहे.