
जयसिंगपूरला उद्यापासून विज्ञान प्रदर्शन
जयसिंगपूरला उद्यापासून विज्ञान प्रदर्शन
जयसिंगपूर, ता. १७ : शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ, रोटरी क्लब ग्रीन सिटी जयसिंगपूर आणि विज्ञान समिती शिरोळतर्फे १९ ते २१ जानेवारी अखेर सुवर्ण महोत्सवी विज्ञान प्रदर्शन येथील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या प्रांगणात होणार आहे.
शिरोळ तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. यामध्ये विविध वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार व माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे.
पारितोषिक वितरण शिक्षणमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इस्त्रो या भारतीय संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ धनेश बोरा मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, शरद पै, अरुण भंडारे, अन्सार चौगुले यांची प्रमुख उपस्थिती आहे. प्रदर्शनानिमित्त शहरात ग्रंथदिंडीचेही आयोजन केले आहे.