Thur, Feb 9, 2023

राकेश खोंद्रे यांची निवड
राकेश खोंद्रे यांची निवड
Published on : 19 January 2023, 12:52 pm
04685
------
राकेश खोंद्रे यांची निवड
जयसिंगपूर: तमदलगे (ता.शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश खोंद्रे यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या युवा सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी निवड केली. पालकमंत्री दीपक केसरकर, पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री खोंद्रे यांना नियुक्तीपत्र दिले. श्री. खोंद्रे हे विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून युवकांसाठी काम करत आहेत. याबरोबरच पक्ष वाढीसाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. याची दखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती केली. पदाच्या माध्यमातून पक्ष वाढीबरोबरच युवकांसाठी भरीव काम करणार असल्याचे खोंद्रे यांनी नियुक्तीनंतर सांगितले.