Wed, Feb 1, 2023

गुन्हा
गुन्हा
Published on : 24 January 2023, 2:10 am
जयसिंगपुरात धारदार हत्यार जप्त
जयसिंगपूर: शहरातील बसस्थानकामध्ये असलेल्या स्वच्छतागृहाजवळ प्रदीप नारायण तलवार (वय २३, रा.मच्छी मार्केट जयसिंगनगर, जयसिंगपूर) याने दहशत माजविण्याच्या उद्देशाने धारदार हत्यार बाळगले होते. जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई करुन हे हत्यार संशयिताकडून जप्त केले. या प्रकरणी तलवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.