Mon, March 20, 2023

मटका कारवाई
मटका कारवाई
Published on : 4 February 2023, 4:54 am
मटकाप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांची कारवाई
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे मटका घेत असताना जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी अशोक कृष्णा गोंधळी (वय ६०, उदगाव) व अस्लम मुल्लाणी (उदगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून २ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलिस रोहित डावाळे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली. जयसिंगपूर येथे करण्यात आलेल्या कारवाईत बाबासाहेब धोंडिराम कांबळे व झहीर अब्बास नणदी (दोघे जयसिंगपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून ११ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलिस संदेश शेटे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली.