क्रांती चौकात आंबेडकर पुतळा उभारणार-आमदार

क्रांती चौकात आंबेडकर पुतळा उभारणार-आमदार

डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी
प्रयत्नशील ः आमदार यड्रावकर
जयसिंगपूर, ता.९: आंबेडकरवादी जनता व चळवळीतील कार्यकर्त्यांनी विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच जयसिंगपूर शहरातील क्रांती चौक परिसरात उभारला जावा अशा भावना व्यक्त केल्या होत्या. जनभावनेचा आदर करत विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर शहरातील क्रांती चौक परिसरात उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पुतळा उभारणार असल्याची माहिती, माजी राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ तालुक्यातील प्रमुख आंबेडकरवादी चळवळीतील संघटनाच्या पदाधिकारीसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर व सकारात्मक चर्चा होऊन हा निर्णय घेतल्याचे सांगताना बैठकीस उपस्थित सर्वच कार्यकार्त्यांनी निर्णयास सहमती दर्शवल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. तालुक्यात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी आंबेडकरवादी जनता व कार्यकर्त्यांची अनेक वर्षाची मागणी होती.
नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी प्रफुल्लकुमार वनखंडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जहांगीर बागवान यांना आवश्यक सुचना दिल्या. संबंधीत जागा मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. जयपाल कांबळे, अभिजित आलासकर यांनी आमदार यड्रावकर यांचे आंबेडकरवादी जनतेच्यावतीने अभिनंदन केले. बैठकीस जयसिंगपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत पाटील, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, नगरपरिषद बांधकाम विभागाचे अभियंता श्री. कुंभार, आरपीआयचे शिरोळ तालुका सचिव संजय शिंदे, लोकजनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुधीर कुरुंदवाडे, बी.आर.कांबळे, संजय कुरुंदवाडे, राजू बनपट्टी, अब्दुल बागवान, सुर्यकांत कांबळे, सेनापती भोसले, पद्माकर कांबळे, युवराज गायकवाड, विशाल आयगोळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com