
शैक्षणिक साहित्याचे वाटप
04913
ट्रेकर्स ग्रुपतर्फे
दीड लाखांचे साहित्य वाटप
जयसिंगपूर : येथील ट्रेकर्स ग्रुपच्यावतीने पाटण तालुक्यातील १९ गावातील विद्यार्थ्यांना दीड लाखांच्या शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. आर्थिक मागासलेपणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. शिक्षणासाठी अपुरी साधन सामग्री लक्षात घेऊन ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनी मिष्ठेवाडी, कट्टेक, दिवशी खुर्द अशा तीन केंद्रातील या शाळांच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. स्कूल बॅग, वह्या, पट्टी, पेन, पेन्सिल, कंपास, खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. राजू भमाज, सागर माने, ओंकार कुलकर्णी, अभिजीत कोकाटे, संतोष जांगडे, अरुण जगदाळे, राजकुमार ढेकणे, शामराव गायकवाड, प्रकाश बंडगर, विनोद रजपूत, सचिन पोर्लेकर, लिंगाप्पा बेटेगिरी आदींनी यासाठी परिश्रम घेतले.