
शेखर गायकवाड मानद उपाधी जाहीर
04978, 04977
अॅलेक्स स्टोजोवस्की
शेखर गायकवाड
...
घोडावत विद्यापीठाचा शनिवारी दीक्षान्त सोहळा
जयसिंगपूर, ता. १ : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाचा चौथा दीक्षान्त समारंभ शनिवारी (ता. ४) सकाळी दहा वाजता घोडावत विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. सायन्स अँड इंजिनियरिंग रिसर्च बोर्ड, गव्हर्न्मेंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ. अखिलेश गुप्ता प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष संजय घोडावत अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी दिली.
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘सोहळ्यात स्वीनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी (ऑस्ट्रेलिया) येथील प्रोफेसर अॅलेक्स स्टोजोवस्की यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणितीय शिक्षणामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग व रिन्यूएबल एनर्जी या विषयातील आंतरराष्ट्रीय संशोधनातील योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या उपाधीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना सामाजिक क्षेत्रात आणि प्रशासकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मानद उपाधी प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी ९३६ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. पदवी व ३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात येणार आहे. यंदापासून विशेष प्रावीण्य प्राप्त एका विद्यार्थ्याला प्रेसिडेंट पुरस्कार व समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमामध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदके आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, ॲकॅडमिक डीन डॉ. उत्तम जाधव यांनी केले आहे.