सामाजिक उपक्रमांनी चकोतेंचा वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक उपक्रमांनी चकोतेंचा वाढदिवस
सामाजिक उपक्रमांनी चकोतेंचा वाढदिवस

सामाजिक उपक्रमांनी चकोतेंचा वाढदिवस

sakal_logo
By

05109
नांदणी : मतिमंद मुलांसोबत वाढदिवस करताना उद्योगपती अण्णासाहेब चकोते.
---------
सामाजिक उपक्रमांनी
चकोतेंचा वाढदिवस
जयसिंगपूर, ता. २४ : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, उद्योजक अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस आज सामाजिक उपक्रमांनी उत्साहात झाला. वृक्षारोपण, रक्तदान, फळेवाटप व गतिमंद मुलांना दत्तक घेऊन शैक्षणिक मदत असे विविध उपक्रम घेतले.
नांदणी (ता. शिरोळ) येथे महादेव मंदिर, नवजीवन वाचनालय, शेतकरी भाजीपाला संघ अशा तीन ठिकाणी रक्तदान शिबिर झाले. रक्तदानासाठी महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. गणेश बेकरी कार्यस्थळावर कामगारांसोबत वाढदिवस केला. सन्मती मतिमंद केंद्र, इचलकरंजीतील मतिमंद विद्यार्थ्यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापला. सन्मती मतिमंद केंद्रातील मुलांना दत्तक घेऊन शैक्षणिक खर्चासाठी संस्थेला भरीव देणगी सुपूर्द केली.
ऑल इंडिया ब्रेड असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेच्या सीनिअर व्हाईस प्रेसिडेंटपदी फेरनिवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या. चकोते उद्योग समूहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अण्णासाहेबांचे वडील बाळासाहेब चकोते, कार्यकारी संचालक सतीश चकोते उपस्थित होते. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, ज्येष्ठ नेते बाबा देसाई आदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. उद्योगपती संजय घोडावत, जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने आदींनीही शुभेच्छा दिल्या.