राज्यातील शेतकरी बारसूतील शेतकऱ्यांच्या पाठीशी- शेट्टी

राज्यातील शेतकरी बारसूतील शेतकऱ्यांच्या पाठीशी- शेट्टी

राज्यातील शेतकरी बारसूतील
शेतकऱ्यांच्या पाठीशीः शेट्टी

जयसिंगपूर, ता.२९: बारसू (जि. रत्नागिरी) येथील रिफायनरीच्या सर्वेक्षणावरून आंदोलन सुरू आहे. पोलिसांकडून सुरू असणारी दडपशाही अयोग्य असून राज्यातील शेतकरी बारसूच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. स्थानिक शेतकऱ्यांना नको असणारा हा प्रकल्प कदापि होऊ देणार नसल्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शेट्टी म्हणाले,‘ बारसू येथे पोलिसांनी जी दडपशाही केली आहे त्याचा निषेध करतो. त्याठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकरी स्त्री-पुरुषांवर बेशुद्ध होईपर्यंत प्रचंड असा लाठीचार्ज केला आहे. जमीन द्यायची नाही, अशी भूमिका घेणाऱ्या भूमिपुत्रांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल तर पोलिसांना व आदेश देणाऱ्या राज्यकर्त्यांना शरम वाटली पाहिजे. बारसूचे शेतकरी एकाकी आहेत म्हणून दडपशाहीचा वापर करून हे आंदोलन मोडीत काढणार असाल तर आपण राज्यातील शेतकऱ्यांना घेऊन त्यांना पाठबळ देऊ. या आंदोलनात दोन हात करायचे असतील तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याबरोबर दोन हात करण्याची तयारी राज्य सरकारने दाखवावी.या शेतकऱ्यांबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठामपणे उभी आहे. त्यामुळे पोलिसांची व राज्यकर्त्यांची दडपशाही खपवून घेणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com