नवे, जुने दानवाडला बारा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

नवे, जुने दानवाडला बारा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

05304, 05303

जुने दानवाड: नदीपात्र कोरडे पडल्याने बारा दिवसांपासून नळाला थेंबभरही पाणी नाही. अशा स्थितीत ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या एकमेव कुपनलिकेचा आधार होत आहे. दुसऱ्या छायाचित्रात नदीपात्र कोरडे पडल्याने मासे मृत्युमुखी पडले आहेत.
...

नवे, जुने दानवाडचा पाणी पुरवठा ठप्प

दूधगंगा नदी पात्र कोरडे ः बारा दिवसांपासून नळाला थेंबभरही पाणी नाही

जयसिंगपूर, ता.२९: चार नद्यांनी समृद्ध बनलेला आणि महापुराच्या काळात सर्वाधिक नुकसानीला तोंड देणाऱ्या शिरोळ तालुक्यातील जुने आणि नवे दानवाडला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील या गावांचा गेल्या बारा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. जुने दानवाड ग्रामपंचायतीच्या एकाच कुपनलिकेवर गावाची तहान भागत आहे. दूधगंगा नदी कोरडी पडल्याने ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
१७ एप्रिल रोजी ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा विभागामार्फत ग्रामस्थांना पाण्याचा पुरवठा केला होता. यानंतर आजपर्यंत नळांना थेंबभरदेखील पाणी आलेले नाही. जुने दानवाडमध्ये ग्रामपंचायतीच्या एकमेव कुपनलिकेवर सध्या पाण्याची गुजराण होत आहे. मुबलक प्रमाणात नसले तरी गरज भागण्यापुरते पाणी उपलब्ध होत असले तरी तासनतास पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, जुने आणि नवे दानवाडची पाणीटंचाई हे तालुक्यातील प्रातिनिधिक चित्र जरी असले तरी पाऊस लांबला तर मात्र शिरोळ तालुक्यातील बहुतांश भागाला पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत.
....

‘पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत नदीपात्रात पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. तरीदेखील संपूर्ण उन्हाळ्यात नदीकाठच्या ग्रामस्थांना किमान पिण्यासाठी तरी पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेणार आहे. पाटबंधारेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून तालुक्यातील कोणत्याही गावात पाणी टंचाई भासणार नाही यासाठी पाठपुरावा करणार आहे.

- राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार
....

‘१७ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्यावतीने पाणी पुरवठा करण्यात आला होता. यानंतर नदीतच पाणी नसल्याने नळांचा पाणीपुरवठाही बंद आहे. याबाबत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे. तरी देखील अद्याप याला म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. पाणी टंचाई लक्षात घेता पाटबंधारे विभागाने तातडीने नदीपत्रात पाणी सोडून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

वैशाली पाटील, सरपंच, जुने दानवाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com