शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी

शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी

05327

शिरोळ: रत्नागिरी पोलिसांनी सोमवारी रात्री राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीचे आदेश लागू केले.
...

राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी

बारसू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांची नोटीस

जयसिंगपूर, ता.२: बारसू (जि. रत्नागिरी) येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर रत्नागिरी जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली. याचबरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही बंदी घालण्यात आलेली आहे. रत्नागिरी पोलिसांनी सोमवारी (ता.१) रात्री उशिरा ही नोटीस लागू केली आहे.
बारसू प्रकल्पास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याबाबत व या प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्यावर लाठीहल्ले, अश्रूधूरांचा वापर करून त्यांना या ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली असून त्यांच्या प्रतिनिधींनी त्याठिकाणी उपस्थित राहून या प्रकल्पास विरोध केला आहे.
सोमवारी रात्री उशिरा रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्यावतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होवून त्यांना समक्ष ही नोटीस लागू केली आहे.
...


‘अशा नोटिशींना मी भीक घालत नाही. ज्याठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार आहे. लोकशाहीमध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायरप्रमाणे वागू लागले आहे. काही मूठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे.

राजू शेट्टी, माजी खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com