
''पार्श्वनाथ''च्या अध्यक्षपदी दिलीप पाटील-कोथळीकर
05511
दिलीप पाटील-कोथळीकर
05512
दीपक पाटील
''पार्श्वनाथ''च्या अध्यक्षपदी
दिलीप पाटील-कोथळीकर
जयसिंगपूर, ता. २८ : येथील श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील-कोथळीकर यांची, तर उपाध्यक्षपदी दीपक पाटील यांची बिनविरोध फेरनिवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. जी. खोत यांच्या अध्यक्षतेखाली निवडी झाल्या.
संचालक राजेंद्र नांद्रेकर, कृष्णा शेट्टी, गणपती शिंगाडे, अविनाश टारे, विनय कदम, मणिलाल पोरवाल, सचिन पाटील, योगेश शेटे, नारायण डोंगरे, सीमा कनवडे, शोभा चकोते, सचिव वसंत भूपाल पाटील उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. श्री. पाटील म्हणाले, ‘२०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेला आठ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेकडे सात कोटी रुपयांच्या ठेवी असून, चार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा सामाजिक उपक्रमातही सहभाग असतो. सभासदांना दहा टक्केप्रमाणे लाभांश वाटप केला जातो. येणाऱ्या काळातही संस्था प्रगतीवर राहील.’