जयसिंगपूर, चिपरीत बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूर, चिपरीत बंद
जयसिंगपूर, चिपरीत बंद

जयसिंगपूर, चिपरीत बंद

sakal_logo
By

05532
जयसिंगपूर: क्रांती चौकात आलेला मोर्चा.
...

महिला अत्याचारप्रकरणी
जयसिंगपुरात मूक मोर्चा

जयसिंगपूर, ता.२९: चिपरी (ता. शिरोळ) येथील महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अस्लम सवनूर याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी (ता.२९) शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. मागणीच्या समर्थनार्थ जयसिंगपूर बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्रांती चौक येथे सभेनंतर आंदोलनाची सांगता झाली. चिपरीतही बंदला प्रतिसाद मिळाला.
वडार समाजासह सर्वपक्षीय व संघटना यांच्यावतीने चिपरी व जयसिंगपूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. सोमवारी सकाळी शाहूनगर येथे मूक मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा पटेल चौक नांदणी रोड मार्गे क्रांती चौकात आला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, संशयिताला कठोर शासन व्हावे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, मोकाट नराधमांना तत्काळ गजाआड करावे, चिपरी येथील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी पाठीशी घालू नये, संशयीताला फाशी द्यावी, अशा मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. यावेळी जलदगतीने न्यायालयात हा खटला चालवून संशयिताला शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, संतोष जाधव, सावकर मादनाईक, अर्जुन देशमुख, आशाताई गाडीवडर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार यड्रावकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांना समाजाच्यावतीने निवेदन देवून कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, मिलिंद भिडे, राजेंद्र दार्इंगडे, रमेश यळगुडकर, अशोक कोळेकर, आसावरी आडके, राजेंद्र आडके, मिलिंद शिंदे, सुनिल ताडे, विठ्ठल मोरे यांच्यासह समस्त वडार समाज यावेळी उपस्थित होता.