Mon, Sept 25, 2023

विनयभंग गुन्हा
विनयभंग गुन्हा
Published on : 29 May 2023, 6:50 am
विनयभंग, मारहाणप्रकरणी गुन्हा
जयसिंगपूर : विनयभंग व मारहाणप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आशिष विश्वास गोसावी, सुषमा विकास गोसावी, दिपाली राहुल गोसावी, विश्वास अभिमन्यू गोसावी, राहुल विश्वास गोसावी, सुरेखा गोसावी (सर्व रा. गल्ली नं. ९, राजीव गांधीनगर जयसिंगपूर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबतची तक्रार पिडीत महिलेने पोलिसांत दिली आहे. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. संशयित आशिष गोसावी याने पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तर इतर संशयितांनी पिडीतेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून मारहाण केली.