‘रोटरी’च्या अध्यक्षपदी संजय माणगावे

‘रोटरी’च्या अध्यक्षपदी संजय माणगावे

Published on

05765
संजय माणगावे
05764
विद्यासागर आडगाणे
----------
‘रोटरी’च्या अध्यक्षपदी संजय माणगावे
जयसिंगपूर, ता. ६ : येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी संजय माणगावे यांची, तर सेक्रेटरीपदी विद्यासागर आडगाणे यांची निवड केली. नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ शनिवारी (ता.८) सायंकाळी साडेपाच वाजता इंगळे सभागृहात होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष सचिन शेडबाळे, सेक्रेटरी स्वप्निल इंगळे यांनी दिली.
ते म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून ५९ वर्षांपासून शहरात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला, क्रीडा अशा क्षेत्रांत भरीव योगदान दिले आहे. पदग्रहण ऑफिसर म्हणून बेळगावचे उद्योजक, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार उपस्थित राहणार आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे असिस्टंट गव्हर्नर सीए श्रीकिशन भुतडा प्रमुख उपस्थित असणार आहेत. रमेश इंगळे, प्रकाश निटवे, अरुणा पाटील, डॉ वसुंधरा घोडके, ॲड श्रीकांत घोडके, आसिफ पटेल, सुदर्शन एडवान, सुमित पाटील, अजय मगदूम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.