शनिवारी कार्यशाळा

शनिवारी कार्यशाळा

Published on

‘क्रिडाई’च्या दक्षिण महाराष्ट्रातील
प्रतिनिधींचे उद्या चर्चासत्र

जयसिंगपूर, ता. ६ ः ‘क्रिडाई’च्या दक्षिण महाराष्ट्रातील १६ शहरांतील प्रतिनिधींचे चर्चासत्र शनिवारी (ता. ८) येथे होत आहे. बांधकाम व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणी आणि विविध शासकीय धोरणांविषयी विचारमंथन होणार असल्याची माहिती, क्रिडाईचे अध्यक्ष राहुल कुंभार व सचिव संदीप विभुते यांनी दिली.
शहरातील आदी हॉटेलमध्ये चर्चासत्र होणार असून, उद्‌घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते आणि तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. टीडीआरविषयी विद्यानंद बेडेकर, रेरा कायद्याविषयी दिलीप पाटील, विविध प्रकारच्या नोंदणी योग्य दस्तऐवजाविषयी अशोक सारडा व मयूर शहा आणि शहर मूल्यांकनाबाबत दशरथ शेट्ये, तसेच अपार्टमेंट इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती, फलटण, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मालवण, चिपळूण, कराड, इस्लामपूर, कागल, इचलकरंजीतील क्रिडाईचे पदाधिकारी, सभासद उपस्थित राहणार आहेत. यावेळी जयसिंगपूर क्रिडाईचे उपाध्यक्ष रणजित महाडिक, खजिनदार अमर पाटील, माजी अध्यक्ष सुदर्शन चौगुले, विक्रम शिंदे, प्रवीण बलदवा, सुनील सुतार, सायली कारेकर, अतुल शिंदे उपस्थित राहणार असल्याचे कुंभार, विभुते यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.