चिकनगुणियाची लक्षणे दिसल्यास उपचार घ्यावेत

चिकनगुणियाची लक्षणे दिसल्यास उपचार घ्यावेत

Published on

05875
कोथळी : चिकनगुनियाच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर आदी.
----------
चिकनगुणियाची लक्षणे दिसल्यास उपचार घ्यावेत
डॉ. पाडुंरंग खटावकर; कोथळीत आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन बैठक
जयसिंगपूर, ता. १८ : कोथळी (ता. शिरोळ) येथे चिकनगुनियाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाने गावात स्वच्छता, धुर फवारणी, शुद्ध पाणी आदींवर प्रतिबंधक उपाययोजना तत्काळ कराव्यात. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्‍यांनी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची माहिती घ्यावी व परिसर स्वच्छ आहे की नाही याचीही माहिती घ्यावी. शिवाय ज्या नागरिकांना चिकनगुनियाची लक्षणे आहे. अशा रुग्णांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन प्राथमिक उपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी केले.
कोथळी (ता. शिरोळ) येथे चिकनगुनियाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाची बैठक झाली. यावेळी ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक यांनी ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्‍यांना धूर फवारणी व इतर उपाययोजनांबाबत सहकार्य करण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले.
सरपंच भरतेश खवाटे, पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील, माजी सरपंच वृषभ पाटील, दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन डोने, आरोग्य विस्तार अधिकारी पी. एन. महाडिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कामते यांनी विविध सुचना मांडून साथ आटोक्यात आणण्याबाबत सूचना केल्या. जावेद मुल्ला, कीटक संवारक संजय पाटील, आरोग्य सहाय्यक सुरज नेतले, एस. डी. औंधकर, प्रीती खाडे, संजय भोसले, प्रकाश बुरुटे, प्रशांत कांबळे, एस. डी. नरुटे, कुमार सुतार, शरद कांबळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.