शिरोळमध्ये फ्लॉवरवर रोग

शिरोळमध्ये फ्लॉवरवर रोग

05877
नांदणी : काढणीला आलेल्या फ्लॉवर पिकावर हा रोग पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
-----------
शिरोळमध्ये फ्लॉवरवर रोग
पाने लागली करपू; जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
जयसिंगपूर, ता. १८ : शिरोळ तालुक्यातील फ्लॉवरवर आठ दिवसांत नवीनच रोगाने थैमान घातले आहे. या नवख्या रोगामुळे काढणीला आलेली फ्लॉवरची पाने खालच्या भागातून करपू लागली आहेत. त्यामुळे भरमसाठ खर्च करून फड जागवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.
परिसरात अद्याप म्हणावा तसा पाऊस नाही. अवकाळीनेही या भागात अवमर्जी केली होती. त्यामुळे तोडक्या पाण्यावर अफाट खर्च करून शेतकऱ्यांनी पिके जगवली. दर पण बरा मिळणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यातच या रोगामुळे काढणीला आलेले पीक वाळत चालले आहे. त्यामुळे काही वर्षापूर्वी या गावातून विविध भाजीपाला संघातर्फे शेकडो हेक्टर शेतीत भाजीपाला पिकाचे उत्पादन करून महाराष्ट्रसह कर्नाटक व हरियाणा राज्याकडे आठवड्याला शंभर ते दीडशे ट्रक भाजीपाला घेऊन रवाना व्हायचे. पण अनियमित दर आणि आटोक्यात न येणारे रोगांचे प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. तरीही काही शेतकरी फ्लॉवर पिके करताना पहावयास मिळतात. पण आता या नवीनच आलेल्या रोगाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
बेभरवशाचा पाऊस, पाण्याची कमतरता तसेच कारप्या, दावण्या, लाल अळी, मूळ कुजव्या, मूटऱ्या आदी आटोक्यात न येणारे रोग यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. भाजीपाला उत्पादनासाठीचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी लागणारे तरु (रोपे), औषधे, कीटकनाशके आणि माल बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारे बकेट (कॅरेट) व वाहतूक खर्च हा लाखो रुपयांचा असतो. त्यातच अशा नवीन रोगांचा शिरकाव शेतकऱ्यांना मारक ठरत आहे.
-----------
फ्लॉवरवरील रोगाची माहिती घेतली जात आहे. दोन दिवसांत याबाबत स्पष्टपणे बोलता येईल. माहिती घेतल्यानंतरच यावरील उपाय शेतकऱ्यांना सांगणे योग्य होईल.
-चंद्रकांत जांगळे-पाटील, तालुका कृषी अधिकारी, शिरोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com