चौपट भरपाई आदेशापर्यंत महामार्गावर काम नाही

चौपट भरपाई आदेशापर्यंत महामार्गावर काम नाही

चौपट भरपाईशिवाय महामार्गावर काम नाही
कृती समितीची इशारा ः कोल्हापूरमध्ये प्राधिकरणच्या उपप्रबंधकांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १० : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक ते उदगांव मार्गात शुक्रवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे प्रास्तावित मार्गाच्या जमीन हस्तांतर करण्यासाठी आलेले कर्मचारी विना मार्किंग परतले होते. दरम्यान, शनिवारी अतिग्रेत शेतकरी एकत्रित आल्यानंतर पोलिसांनी त्यांना महामार्गावर उतरण्यास मज्जाव केला. त्यानंतर कृती समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी कोल्हापूर येथे राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात धाव घेऊन चौपट भरपाईचा कोणताही आदेश होईपर्यंत महामार्गावर कोणतेही काम होऊ देणार नाही. शिवाय आठ दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढील निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने शुक्रवारी चोकाक येथे खुणा रोवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे शेतकऱ्यांनी एकत्रित येत पोलिसांनी जमण्यास मज्जाव केला. कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, आनंदराव पाटील, संजय सूर्यवंशी, सन्मती पाटील, तानाजी पाटील, भरत शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अतिग्रे येथून थेट कोल्हापूर येथील राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात धाव घेतली.
यावेळी प्राधिकरणचे उपप्रबंधक गोविंद बेरवार यांच्याशी चर्चा केली.
उपप्रबंधक बेरवार म्हणाले, ‘चौपट भरपाईबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. प्राधिकरण विभागाने मोजणीसाठी भूमिआभिलेख कार्यालयाकडे पैसे भरले आहेत. त्यामुळे मोजणी प्रक्रिया होण्यासाठी चोकाक ते उदगांवदरम्यान हद्दीच्या खुणा रोवण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यां‍च्या तक्रारी आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करतो. यावेळी वरिष्ठाकडून निर्णय कळेल.’
---------
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर पुढील निर्णय
चौपट भरपाई व होणाऱ्‍या महामार्गातील त्रुटी दूर होणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्राधिकरण विभागाला कोणतेही काम होऊ देणार नाही. याबाबत येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे चोकाक ते उदगांवपर्यंत कोणतेही काम प्राधिकरण विभागाने करू नये; अन्यथा शेतकरी गप्प बसणार नसल्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com