सोन्याने ओलांडला ६९ हजारांचा टप्पा

सोन्याने ओलांडला ६९ हजारांचा टप्पा

सोन्याने ओलांडला ६९ हजारांचा टप्पा
लग्न सराईत फटका; एक महिन्यांत दरात सहा हजाराने वाढ

गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ४ : अमेरिकन बँकिंग क्षेत्राच्या अस्थिरतेचा परिणाम व भारतीय अर्थव्यवस्थेतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता सोने-चांदीच्या दरात आणखी तेजी आल्याचे दिसून येते. सोन्याच्या दरात एका महिन्यातच तब्बल सहा हजारांची घसघशीत वाढ झाली असून गुरुवारी (ता. ४) सोन्याचे प्रती तोळा भाव ६९ हजार रुपयांवर पोहोचला. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदीत आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.
विशेषतः लग्न सराई असल्याने सोने दरवाढीवर परिणाम होणार आहे. भारतीयांना सोने-चांदीच्या दागिन्यांचे विशेष आकर्षण असून, सोन्याचे दर कितीही वाढले तरी खरेदीत फारशी घट नसल्याचे दिसून येते. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात गर्दी होत आहे. सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उताराचा फारसा परिणाम खरेदीवर होत नाही, असे सराफ व्यावसायिक सांगतात.
आगामी काळ हा लग्नसराईचा असल्यामुळे सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गुंतवणुकीचा चांगला आणि खात्रीलायक पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोने, चांदीमध्ये गुंतवणूक करतात. मागील एका महिन्यात सोन्याच्या प्रती तोळा दरात तब्बल सहा हजारांनी वाढ झाली. सध्या बाजारात सोने प्रती तोळा ६९ हजार रुपये प्रति तोळा दर आहे. शिवाय यावर किमान दोन हजार रुपये जीएसटी बसते. त्याचबरोबर चांदी ७५ हजार ५०० च्या आसपास दर आहेत. सध्या येत्या पंधरा दिवसांपासून लग्न सराईला सुरू होत आहे. सध्या सोन्याच्या दर वाढीने ग्राहकांची अर्थिक कोंडी होत आहे.
....
दरवाढ अशी (प्रति दहा ग्रॅम) (ग्राफ करणे)
मार्च-(२०२३)-५५,८९०
जून-६०,१८०
सप्टेंबर-५९,४८०
डिसेंबर-६३,२७०
जानेवारी-(२०२४)- ६१,१००
फेब्रुवारी-६२,९००
मार्च-६५,९००
एप्रिल-६९,०००
------------
दीड महिन्यात सोन्याच्या प्रति तोळ्याला तब्बल दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या लग्नसराई असल्याने सोने खरेदीसाठी ग्राहक येत असतात. मात्र दर वाढीमुळे ज्याला दोन तोळे सोने घ्यायचे आहे तो ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करतात. या सोन्याच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका ग्राहकांना बसतो. शिवाय सोन्याचा दर कमी होण्याची शक्यता फार कमी असते.

-युवराज शहा,
सराफ व्यवसायिक, जयसिंगपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com