मगदूम अभियांत्रिकीच्या २७ विद्यार्थ्यांची निवड

मगदूम अभियांत्रिकीच्या २७ विद्यार्थ्यांची निवड

08120
जयसिंगपूर : निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह डॉ. विजय मगदूम. शेजारी प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील, आदी.

मगदूम अभियांत्रिकीच्या २७ विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विविध विभागांतील २७ विद्यार्थ्यांची निवड सेव्हंथ सेन्स टॅलेंट सोल्युशन्स बेंगलुरू कंपनीमध्ये वार्षिक साडेचार लाखांच्या पॅकेजवर झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांच्या हस्ते करण्‍यात आला.
योग्य मार्गदर्शन, अचूक अभ्यासाची दिशा, व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व ट्रेनिंग अॅन्‍ड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. पी. पी. माळगे यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे, असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी नमूद केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या बालाजी जारे, तन्मय पाटील, भक्ती कुलकर्णी, अनुश्री मुथालिक, अभिषेक नांदगावकर, दीप कमलाकर, आकाश पाटील, श्रेया ठोंबरे, आरती खाडे, रिनल शहा, सुयोग बावडेकर, आदिती पाटील अशा १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागाच्या प्रज्ञा चव्हाण, रोहित सस्ते, रचना सरगर व एम. सी. ए. विभागाच्या मिसबा शेख तर आय. टी. विभागाच्या नीलेश श्रेयस, राजकुमार ऐनापुरे, यशोदा कोळपे, प्रतीक्षा माने, रुचिता यादव, सोनल मेथे, ऋषिकेश मगदूम, वैभव तोडकर, वैभवी गायकवाड, अवंतिका जांभळे, सायली पाटील यांची निवड झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील मंदीच्या काळातही निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. खरोखरच ही उल्लेखनीय बाब असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com