डेंगी, चिकुनगुनिया प्रश्नी उपाययोजना हव्यात

डेंगी, चिकुनगुनिया प्रश्नी उपाययोजना हव्यात

Published on

डेंगी, चिकुनगुनिया प्रश्नी उपाययोजना हव्यात
जयसिंगपूर पालिकेकडून अपेक्षा; स्वच्छता, धूर फवारणीची गरज
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १ : शहरात साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे डेंगी, चिकुनगुनियासदृश रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. पालिकेने शहरात स्वच्छता, फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
यापूर्वी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या पथकाने शहरात सर्व्हे केला आहे. त्यामुळे आता पालिकेने डेंगी, चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. डेंगी व चिकुनगुनिया एडिस डासांद्वारे पसरणारी साथ आहे. परंतु त्याचा प्रसार वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतो. तो नियंत्रित करण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे डासांची संख्या नियंत्रित करणे गरजेचे आहे. शहरात सर्वत्र, विशेषतः जास्त डासांची घनता आणि डेंगी, चिकुनगुनियाचे रुग्ण असलेल्या भागात डास प्रतिबंधक फवारणी त्वरित करणे आवश्यक आहे. उच्च जोखीम असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून शहराच्या सर्व भागात कसून फॉगिंग आणि फवारणी ऑपरेशन करावे. साचलेले पाणी आणि कचऱ्‍यासह प्रजनन स्थळे नष्ट करावीत.
नागरिकांना डेंगी व चिकुनगुनियाचे धोके आणि आवश्यक खबरदारी याविषयी शिक्षित करण्यासाठी जनजागृती मोहीम वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, शहरात डेंगीने एकाचा मृत्यू झाला असे सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र संबंधित युवकाचा मृत्यू हा डेंगीमुळे झालेला नाही. त्याचा वैद्यकीय रिपोर्टही आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली. त्यामुळे पालिकेने शहरात डेंगी व चिकुनगुनिया रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.