‘लाडकी बहीण’चे अर्ज करताना महिलांना अडचणी येऊ देऊ नका ः आमदार यड्रावकर

‘लाडकी बहीण’चे अर्ज करताना महिलांना अडचणी येऊ देऊ नका ः आमदार यड्रावकर

Published on

‘लाडकी बहीण’चे अर्ज करताना महिलांना
अडचणी येऊ देऊ नका ः आमदार यड्रावकर
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २ : महिलांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबनासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना १५०० रुपये प्रति महिना प्रदान करण्यात येणार आहेत. शिरोळ तालुक्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज करताना महिलांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नका, अशा सूचनाही आमदार यड्रावकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याचे काम शिरोळ तालुक्यात सुरू झाले आहे. यासाठी महिलांना तातडीने कागदपत्रे उपलब्ध व्हावीत आणि ऑनलाइन अर्ज तातडीने भरावेत, यासाठी शिरोळ तालुका प्रशासनाला आमदार यड्रावकर यांनी आदेश दिले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनही घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात येणार असून, महिलांनी आवश्यक कागदपत्रे काढली असल्यास घरी बसूनही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा फॉर्म भरता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.