नांदणीत १४ जुलैपासून चातुर्मास सोहळा

नांदणीत १४ जुलैपासून चातुर्मास सोहळा

Published on

नांदणीत १४ जुलैपासून चातुर्मास सोहळा
२६ त्यागींची उपस्थिती; हजारो भाविकांच्या उपस्थितीचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ७ : दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील ७४३ गावांचे अधिपत्य असलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथे प. पू. चर्याशिरोमणी आचार्य १०८ विशुद्धसागर महाराज यांचा २६ त्यागींसह ३५ वा पावन वर्षायोग (चातुर्मास) १४ जुलैपासून सुरू होणार आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चातुर्मास समिती महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि कर्नाटकचे चातुर्मास समितीचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब नाडगोंडा यांनी केले.
ते म्हणाले, ‘प. पू. आचार्यश्री विशुद्धसागर मुनिश्रींच्या विशाल संघाचा या भागातील हा प्रथमच चातुर्मास (वर्षायोग) होत आहे. रविवारी (ता. १४) सकाळी ७.२५ वाजता नांदणीमध्ये प्रवेश होणार आहे. शनिवारी (ता. २०) दुपारी एक वाजता नांदणीत भव्य चातुर्मास कलश स्थापण्याचा कार्यक्रम होईल. यासाठी द्वादशांग कलश, सोलहकारण कलश आणि महाऋद्धि कलशांची उद्‌घोषणा केली. कलशांचे वितरण चातुर्मास जिनसेन महास्वामी विशुद्धसागर मुनी कमिटीतर्फे करण्यात येत आहे. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामींच्या अधिनेतृत्वाखाली हा चातुर्मास करण्याचा मानस आहे. आचार्यश्रींच्या प्रभावी वाणीने या भागातील श्रावक - श्राविकांना एक आध्यात्मिक पर्वणी लाभणार आहे.’
मंगल प्रवेश व अध्यात्मिक सोहळ्यास सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातील श्रावक, श्राविका हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा व मुनिश्रींच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले. डॉ. अजित पाटील, नांदणी मठाचे ट्रस्टी प्रा. आप्पा भगाटे, ज्येष्ठ जैन साहित्यिक डॉ. चंद्रकांत चौगुले, वीर सेवा दलाचे सचिव अजित भंडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.