जयसिंगपुरात शाळाबाह्य बालकांचे सर्व्हेक्षण

जयसिंगपुरात शाळाबाह्य बालकांचे सर्व्हेक्षण

जयसिंगपुरात शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण
वीस जुलैपर्यंत मोहीम; ३५ शाळांच्या १२० शिक्षकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १०: शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहरातील ३५ शाळांच्या १२० शिक्षकांकडून सर्वेक्षण सुरू आहे. २० जुलैपर्यंत होणाऱ्या सर्वेक्षणात शिक्षक नेमून दिलेल्या परिसरात अशा तीन ते अठरा वर्ष वयोगटांतील मुलांचे सर्वेक्षण करणार आहेत. शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुले आढळून आल्यास त्याला नजीकच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
घरोघरी तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन, वीट भट्टी, खाणी, औद्योगिक वसाहती याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी शिक्षक अशा मुलांचा शोध घेत आहेत. खास करून रोजगारानिमित्त स्थलांतरित झालेल्या कुटुंबांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तीन ते अठरा वयोगटांतील बालक व मुलांचा शोध घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे.
जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण विभागातर्फे १२० शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना सर्वेक्षणाबाबत सूचना दिल्या आहेत. वीस शाळांचे मुख्याध्यापक प्रभाग पर्यवेक्षक म्हणून तर चार शहरस्तरीय परिवेक्षक सर्वेक्षणाचे काम पाहत आहेत. गतवर्षीही शहर व परिसरात अशा मुलांचा शोध घेतला होता. एकही मुलगा शाळाबाह्य, अनियमित अथवा स्थलांतरित आढळून आला नाही. ५ जुलैपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून २० जुलैअखेर सर्वेक्षण चालणार आहे. पाच दिवसांत एकही शिक्षणापासून वंचित असलेला बालक सर्वेक्षणातील शिक्षकांना आढळला नाही. रोजगारानिमित्त अनेक कुटुंबांचे स्थलांतर होत असते. यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता शासनाने घेतली आहे. याच उद्देशाने हे सर्वेक्षण केले जात आहे.
....
शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. वीस शाळांचे मुख्याध्यापक प्रभाग पर्यवेक्षक म्हणून तर चार शहरस्तरीय पर्यवेक्षक सर्वेक्षणाचे काम पाहत आहेत. सर्वेक्षणातील सर्वच घटक एकदिलाने कार्य करत आहेत.
-मेघन देसाई,
केंद्रप्रमुख, जयसिंगपूर पालिका शिक्षण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com