पाऊस

पाऊस
Published on

ढगांच्या गडगटासह
शहरात मुसळधार पाऊस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः शहरासह जिल्ह्यातील काही भागांना आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाने शहर व्यापून गेले होते. सायंकाळी सातच्या दरम्यान सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत थांबून थांबून कोसळत होता. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर झालेल्या पावसाने रात्री हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, नानीबाई चिखलीत एका घरावर वीज कोसळली; मात्र सुदैवाने कोणासही इजा झाली नाही.
जयसिंगपूरमध्ये वीज खंडित
जयसिंगपूर : शहर व परिसराला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. रात्री साडेनऊच्या सुमारास ढगांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. शेतात आता कुठे मशागतीचे दिवस येत असताना झोडपून काढलेल्या पावसाने शेतकऱ्यांना आणखी किमान पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ढगांच्या गडगडात सुरू झालेल्या पावसाने वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता.
(आणखी वृत्त पान ३ वर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com