कनवाड गावाला नवी नौका

कनवाड गावाला नवी नौका
Published on

कनवाडला नवीन नाव
जयसिंगपूर : पुराचा फटका बसणाऱ्या कनवाडला (ता. शिरोळ) जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवी नाव मिळाली. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून कृष्णा नदीकाठावरील कनवाडला नाव मिळाली. संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता या नावेचा उपयोग होणार आहे. कनवाड हे गाव कृष्णा नदीकाठी वसलेले असून, पूरपरिस्थितीमुळे गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे नाव देण्याची ग्रामस्थांची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी जिल्हा परिषदेकडे शिफारस केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद, कोल्हापूरकडून कनवाड गावासाठी नौका देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com