

11186
चिपरी : वासरू संगोपन स्पर्धेवेळी अशोक पाटील, डॉ. सागर पटेल, डॉ. संदीप ताटे, सुहास डोंगळे, सुरेश पाटील आदी.
गोकुळची वासरू संगोपन
योजना आदर्शवत; डॉ. पटेल
चिपरी येथे उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १ : गोकुळ दूध संघाची वासरू संगोपन योजना जिल्ह्यातील आदर्शवत योजना आहे. ही योजना इतरांनाही प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार, राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. सागर पटेल यांनी व्यक्त केले.
चिपरी (ता. शिरोळ) येथे ‘गोकुळ''तर्फे आयोजित उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, अमोल शेळके, डॉ. संदीप ताटे, सहायक दूध संकलन अधिकारी सुहास डोंगळे, सुरेश पाटील उपस्थित होते.
संकलन अधिकारी अशोक पाटील यांनी गोकुळच्या उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धा या दूध उत्पादकांना प्रेरणादायी ठरतील. जातिवंत जनावरांची पैदास व्हावी व कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त दूध उत्पादित व्हावे. या उद्देशाने योजना सुरू केली आहे. यातून सुमारे दोन लाख जातिवंत वासरांची पैदास व संगोपन होण्यास मदत झाली आहे, असे सांगितले. सुहास डोंगळे यांनी तालुक्यात स्पर्धा टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहे. संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त वासरांची नोंद करून सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
डॉ. ताटे यांनी ही स्पर्धा रेडी, पाडी ० ते ६ महिने व ६ ते १ वर्ष या दोन गटांत घेतली जाणार असून, प्रत्येक गटात १ ते ३ विजेत्यांना रोख रक्कम व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या उत्पादकांना संत बाळूमामा संस्थेच्यावतीने मोफत मिनरल मिक्चर वाटप केले.
याप्रसंगी लक्ष्मी दूध संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, संत बाळूमामा संस्थेचे अध्यक्ष अमोल शेळके, राजीव कोळी, संजय कांबळे, अनिल मजलेकर, महावीर पाटील, शुभांगी मगदूम, बापूसो मगदूम उपस्थित होते.
JSP25B11186
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.