कळे: आरोग्य विभागातर्फे चार तालुक्यात विश्वास अभियान प्रशिक्षण संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: आरोग्य विभागातर्फे चार तालुक्यात विश्वास अभियान प्रशिक्षण संपन्न
कळे: आरोग्य विभागातर्फे चार तालुक्यात विश्वास अभियान प्रशिक्षण संपन्न

कळे: आरोग्य विभागातर्फे चार तालुक्यात विश्वास अभियान प्रशिक्षण संपन्न

sakal_logo
By

03054
चार तालुक्यांमध्ये
विश्‍वास अभियान प्रशिक्षण
कळे, ता. १३ : ‘विश्वास मोहीम वर्षभर चालणारी पध्दतशीर कृतीभिमुख मोहीम आहे. ग्रामआरोग्य पोषण, पाणीपुरवठा स्वच्छता समितीद्वारे सुरक्षित जल, स्वच्छताविषयक जागरुकता आणि एकात्मिक आणि सामाजिक एकत्रीकरण बळकट करून लोकसहभाग वाढवून आरोग्यासाठी तरतुदी व उपलब्ध सुविधांचा समन्वय साधला जातो, असे मार्गदर्शन रुग्णकल्याण समिती समन्वयक पल्लवी नकाते यांनी केले. आरोग्य विभागातर्फे राधानगरी, भुदरगड, कागल व पन्हाळा तालुक्यांत राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत ग्रामआरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांचे विश्वास अभियान प्रशिक्षण झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
नकाते म्हणाल्या, ‘ग्रामआरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीअंतर्गत ग्रामस्तरावर वितरित केलेले अनुदान मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन खर्च करावा.’
प्रशिक्षणार्थीना ग्रामआरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे कार्य, प्रत्येक सदस्याचे योगदान, प्राप्त निधी व विनीयोगाबाबत मार्गदर्शन झाले. या प्रशिक्षणासाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक स्मिता खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण कल्याण समिती समन्वयक, जिल्हा समूह संघटक, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत महिला सदस्या, बचत गट सदस्या, सरपंच, आशा गटप्रवर्तक उपस्थित होत्या.