कळे: महावितरणच्या अपुऱ्या विद्युत पुरवठयाला शेतकरी कंटाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: महावितरणच्या अपुऱ्या विद्युत पुरवठयाला शेतकरी कंटाळले
कळे: महावितरणच्या अपुऱ्या विद्युत पुरवठयाला शेतकरी कंटाळले

कळे: महावितरणच्या अपुऱ्या विद्युत पुरवठयाला शेतकरी कंटाळले

sakal_logo
By

03058

कळे: महावितरणच्या कळे उपविभाग कार्यालयाला निवेदन देताना शेतकरी.
...

वीज पुरवठ्यावर बहिष्कार टाकण्याचा
कळे उपविभागाला शेतकऱ्यांचा इशारा

कळे : महावितरणच्या अपुऱ्या विद्युत पुरवठ्याला परिसरातील शेतकरी कंटाळले आहेत. पिकांचे व वेळेचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेतर्फे महावितरणच्या कळे उपविभाग कार्यालयाला निवेदन देण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास असहकार करून वीज पुरवठ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. निवेदनात म्हटले आहे, महावितरण व्यवस्थित वीज पुरवठा करत नाही. ४४० ऐवजी २२० अशा कमी दाबाने विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे विद्युत मोटारी जळत आहेत. कित्येक तास विद्युत पुरवठा खंडित होतो. कायमस्वरूपी वायरमन नसल्याने कंत्राटी वायरमनला सब स्टेशनमधून फिडर बंद करण्याचे परमीट मिळत नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी कुलकर्णी, युवा अध्यक्ष प्रतीक कुलकर्णी, तालुकाध्यक्ष बबन खाटांगळेकर, सचिव रुपेश कांबळे, अरविंद पोवार, बबन कुंभार, नवनाथ कुंभार, संदीप चौगले, विश्वनाथ पोवार, सागर वाळवेकर यांच्यासह वाळोली फिडरवरील पोहाळे, वारनूळ, काटेभोगाव, वाळवेकरवाडी, वाळोली, कुंभारवाडी या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
...
249
रांगोळीः येथील शेततळ्यात मगरीचा वावर.
...


रांगोळी येथील शेततळ्यात मगरीचा वावर

रांगोळीः येथील मळी परिसरात असणाऱ्या शेततळ्यामध्ये शेतकऱ्यांना मगर दिसून आली. ही मगर सहा ते आठ फूट लांब आहे. यामुळे शेततळ्याकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांगोळी गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेततळी आहेत. महापुराच्या काळात नदीपात्रातून पाणी या तळीमध्ये आले होते. याचवेळी ही मगर या तळीमध्ये आली आहे. महापुराचे पाणी उतरल्यानंतर या मगरीस बाहेर जाता आले नाही. दररोज ही मगर तळीच्या काठावर असणाऱ्या शेतात येत आहे. काठावरील शेतीमध्ये काही शेतकरी गवत कापणी करीत होते. यावेळी तळीमधून मगर बाहेर येत असल्याचे आढळले. या तळीमध्ये दररोज महिला धुणे धुण्यासाठी येतात. तसेच शेतकरी आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी व धुण्यासाठी या तळीत उतरतात. मासेमारी करण्यासाठीही बाहेरून लोक येथे येतात. यामुळे या मगरीकडून शेतकऱ्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. या मगरीचा वनविभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
...