
तरूणांनी घेतला ''शारजाई देवी'' चा शोध. कसबा बीड च्या यंग ब्रिगेडच्या तरूणांनी हा ऐतिहासिक ठेवा आणला प्रकाशात.
02174, 02175
कसबा बीड ः येथील यंग ब्रिगेड तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शारजाई देवीची मूर्ती शोधून बाहेर काढली. दुसऱ्या छायाचित्रात शेजारी बांधण्यात आलेले छोटे मंदिर.
...
तरुणांनी घेतला ‘शारजाई देवी’चा शोध
कसबा बीडच्या यंग ब्रिगेडच्या तरुणांनी ऐतिहासिक ठेवा आणला प्रकाशात
नामदेव माने ः सकाळ वृत्तसेवा
कसबा बीड, ता. १९ ः कसबा बीड म्हणजे प्राचीन ‘सुवर्णराजधानी’ हे राजधानीचे गाव म्हणून परिचित आहे. गावात व गावाच्या सभोवती अनेक मंदिरे आहेत. काही सुस्थितीत आहेत, तर काही मंदिरांची फक्त आख्यायिकाच शिल्लक राहिली आहे. या पैकीच एक ‘शारजाई देवी’. मूर्ती व मंदिराचे अवशेष येथील यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज शोधून या परिसराची स्वच्छता केली आणि गावाला पुन्हा एका देवीची ओळख करून दिली.
गावातील ‘बेंदाड’ (पाटील मळा) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी देवी शारजाईचे स्थान आहे. यंग ब्रिगेडच्या तरुणांनी या ठिकाणी जाऊन स्वच्छता करण्याचे ठरविले होते. आज सकाळी सर्वजण एकत्र जमून येथे आले. कसबा बीडच्या मूळ देवतांपैकी ही एक देवी आहे. गेली अनेक वर्षे या मंदिराची वाताहत झाली होती. मंदिराचे सर्व अवशेष इतरत्र विखुरले होते. ते एकत्र करून तरुणांनी छोटी झुडपे तोडून मंदिराचे अवशेष एकत्र केले. साफसफाई करून देवीसाठी एक तात्पुरते आणि छोटेसे मंदिर तयार केले. गावात शारजाई देवीप्रमाणे रेडेलक्ष्मी, तुकाई, भावकाई, मरगाई, तामजाई अशा देवी आहेत. आज या तरुणांनी शारजाई देवीला प्रकाशात आणून जीर्णोद्धार केला. या कार्यात यंग ब्रिगेडच्या पंकज जाधव, ऋषिकेश जाधव, गणेश तिबिले, यश बीडकर, सूरज तिबिले यांनी भाग घेतला.
...
‘गावात शारजाई देवीच्या नावाने नैवेद्य होतो हे माहीत आहे; पण हे मंदिर नेमके कोणत्या ठिकाणी आहे, हे माहीत नव्हते. गावातील ज्येष्ठ लोकांकडून माहिती घेतली. या ठिकाणी जाऊन खात्री करून साफसफाई केली व भग्न होत चाललेली मूर्ती व मंदिराचे अवशेष एकत्र केले. लोकांनी आता एकत्र येऊन मंदिर संवर्धनाचे काम हाती घेतले पाहिजे.
सूरज तिबिले, इतिहास अभ्यासक