कोगे येथे कुस्ती स्पर्धेदरम्यान स्टेज कोसळले. कुणाला ही दुखापत नाही.

कोगे येथे कुस्ती स्पर्धेदरम्यान स्टेज कोसळले. कुणाला ही दुखापत नाही.

कुस्ती स्पर्धेदरम्यान
कोगे येथे स्टेज कोसळले

सकाळ वृत्तसेवा
कसबा बीड, ता.६ः कोगे (ता. करवीर) येथे कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयेजित कुस्ती स्पर्धेत स्टेज कोसळले. यामध्ये कुणीही जखमी झाले नाही, मात्र एकच धावपळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी, सायंकाळी पाच वाजता कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. स्टेजवर माजी आमदार चंद्रदीप नरके, ‘गोकुळ’ चे अध्यक्ष अरूणकुमार डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके, एस.आर.पाटील, कुंभी कासारी साखर कारखान्याचे सर्व संचालक यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आठ वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती सुरु असताना स्टेजवर मान्यवरांची गर्दी झाली. थोडा वेळ किरकोळ आवाज झाला. आणि अचानक मोठा आवाज होऊन संपूर्ण स्टेजच कोसळले. स्टेजवर बसलेले मान्यवर खुर्चीवरून खाली पडले. जवळपास अर्धा तास कुस्त्या थांबवण्यात आल्या होत्या. यावेळी कुणालाही दुखापत झाली नाही. स्पर्धेचे आयोजक कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी सर्व मान्यवरांची विचारपूस केली व प्रेक्षकांना शांततेचे आवाहन केले. कुस्ती शौकीन स्टेजच्या दिशेने धावले. थोड्या वेळाने पुन्हा कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com