सिकंदर शेखने चंदूरातील मैदान मारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिकंदर शेखने चंदूरातील मैदान मारले
सिकंदर शेखने चंदूरातील मैदान मारले

सिकंदर शेखने चंदूरातील मैदान मारले

sakal_logo
By

03187, 03186
चंदूर : येथील मैदानात गंगावेसच्या सिकंदर शेख याने रेल्वे आखाड्याच्या भोला पंजाबी याला एक चाकी डावावर चितपत केले. दुसऱ्या छायाचित्रात सिकंदर शेख याला मानाची गदा व बक्षीस देताना आमदार प्रकाश आवाडे, महेश पाटील आदी.

चंदूरच्या मैदानात सिकंदर शेख विजयी
---
महासिद्ध यात्रेनिमित्त आयोजन; रेल्वे आखाड्याचा भोला पंजाबी पराभूत
रवींद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. १० : चंदूर (ता. हातकणंगले) येथील श्री महासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त ग्रामपंचायत व यात्रा समितीतर्फे राष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान झाले. यात गंगावेश तालीमच्या महान भारतकेसरी सिकंदर शेख याने अवघ्या एक मिनिट दहा सेकंदात एकचाकी डावावर भारतीय रेल्वे आखाड्याच्या भारतकेसरी भोला पंजाबी याला अस्मान दाखविले. सिकंदरला आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते चांदीची गदा, रोख रक्कम असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. प्रमुख झालेल्या कुस्त्यांमध्ये हरियानातील भारतकेसरी विक्रम केठीवाला याने पंजाबकेसरी हॅप्पी पंजाब याच्यावर मात केली. ट्रिपल कर्नाटक केसरी कार्तिक काटे याने अटीतटीची लढत देत हरियानाचा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन राकेश कुमार यास अस्मान दाखविले. गंगावेश तालीमचा ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन दत्ता नरळे याने पंजाबच्या नवीन कुमार याला चितपट केले. इतर विजेते असे ः प्रशांत शिंदे (सांगली), कलिम मुल्लाणी (कोल्हापूर), शोयब पटेल (कऱ्हाड). महिलांच्या कुस्तीत सायली भुसिंगे हिने स्नेहल पुजारीवर मात केली. अन्य विजेत्या अशा ः गायत्री ताटे (दोनवडे), तृप्ती गुरव(दोनवडे), पूजा सासणे (इचलकरंजी), काजल घागरे (दोनवडे).
मैदानात हातकणंगले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेतील फायनलच्या कुस्त्या झाल्या. प्रथम क्रमांक विजेते २७ किलो वजन गट- ओम माळी (हुपरी), ३२ किलो वजन गट- युवराज कामाण्णा (पट्टणकोडोली), ३८ वजन गट- रोहित खाडे (इचलकरंजी), ४१ वजन गट- राज हजारे (चंदूर), ४५ किलो वजन गट- संदेश आवटी (पट्टणकोडोली), ५१ किलो वजन गट- समर्थ माळी (हुपरी), ५७ किलो वजन गट- श्रीकांत कामाण्णा (पट्टणकोडोली), ६१ किलो वजन गट- सोमनाथ कामाण्णा (पट्टणकोडोली), ६५ किलो वजन गट- रोहन ढोले (चंदूर), ७१ किलो वजन गट- श्रेयस गाठ (हुपरी), ७५ किलो वजन गट- पृथ्वीराज मगदूम (इचलकरंजी).
या वेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह, पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, सरपंच अनिता माने, उपसरपंच संजय जिंदे, ग्रामसेवक बी. व्ही. कांबळे, अशोक पाटील, मोसमी आवाडे, वैशाली आवाडे उपस्थित होते. सचिन पुजारी यांनी नियोजन केले. धनाजी मदने (पंढरपूर), जोतिराम वाझे, मायकल चिपरीकर यांनी निवेदक म्हणून काम केले. प्रा. रघुनाथ शिरढोणे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब करडे व सहकारी यांच्या हलगीवादनाने कुस्तीत रंग भरला. चंदूरमध्ये प्रथमच राष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान असल्याने पंचक्रोशीतील कुस्तीशौकिनानी अभूतपूर्व गर्दी केली होती.