
महिलांनी सामाजिक उपक्रम राबवावेत
03206
कबनूर ः संजय म्हेतर यांनी विवेकानंद फाउंडेशनला लॅपटॉप भेट देताना.
-----------
महिलांनी सामाजिक उपक्रम राबवावेत
मोसमी आवाडे; कबनूर येथे महिला मेळावा
कबनूर, ता. १९ ः महिलांनी संघटित होऊन सामाजिक उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन मोसमी आवाडे यांनी केले.
येथील विवेकानंद फाउंडेशन व दुर्गाशक्ती महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दुर्गाशक्ती मंचच्या अध्यक्षा वैशाली कदम होत्या. सामाजिक कार्यकर्ते संजय म्हेतर यांनी विवेकानंद फाउंडेशनला लॅपटॉप भेट दिला.
समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच शोभा पोवार, पुरवठा निरीक्षक शुभांगी पाटील, महा-ई-सेवा केंद्र उत्कृष्टपणे चालवणाऱ्या संजीवनी खोत, खेलो इंडियामध्ये निवड झाल्याबद्दल महेश मकुभाई यांचा सत्कार केला.‘जागर सावित्रीचा’ या विषयावर स्नेहल कोळी यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नेते बी. डी. पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, उपसरपंच सुधीर पाटील, सुधाकर कुलकर्णी, माजी उपसरपंच निलेश पाटील, मोहन मालवणकर आदी उपस्थित होते. विकास फडतारे यांनी आभार मानले.