Mon, March 27, 2023

जागरूक पालक सुदृढ बालक मोहिम
जागरूक पालक सुदृढ बालक मोहिम
Published on : 16 February 2023, 11:55 am
जागरूक पालक सुदृढ बालक मोहीम
कबनूर ः येथील कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यामंदिर, कबनूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे जागरूक पालक सुदृढ बालक मोहीम हा उपक्रम राबवला. आरोग्य केंद्र, हातकणंगले व इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, इचलकरंजीतर्फे ही मोहीम राबवली. ० ते १८ वयोगटातील बालक व किशोरवयीन मुलामुलींचे सर्वांगीण आरोग्य, याविषयावर आरोग्य अधिकाऱ्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेच्या प्रोजेक्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑनलाईनद्वारे मनोगत विद्यार्थ्यांना दाखवले. अध्यक्षस्थानी शोभा पोवार होत्या. ग्रामपंचायत सदस्या रोहिणी स्वामी, रजनी गुरव, मुख्याध्यापक पी. डी. चौगुले, सुप्रिया नोरजे, डॉ. सतीश कोगनोळे आदी उपस्थित होते.