विज्ञानाचा ध्यास काळाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञानाचा ध्यास काळाची गरज
विज्ञानाचा ध्यास काळाची गरज

विज्ञानाचा ध्यास काळाची गरज

sakal_logo
By

03307
हातकणंगले ः येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. योजना जुगळे, प्रा. प्रवीण गुरव आदी उपस्थित होते.
---------------
विज्ञानाचा ध्यास काळाची गरज
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे; डांगे महाविद्यालयात विज्ञान दिन
कबनूर, ता. २ ः स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विज्ञानाचा ध्यास घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. योजना जुगळे होत्या. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन यांचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते केले. प्रश्नमंजुषाचे आयोजन केले. मानसी जाधव हिने मनोगत व्यक्त केले. प्राचार्या डॉ. योजना जुगळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. प्रा. शुभांगी कांबळे, प्रा. तृप्ती खोत, प्रा. सिद्धेश्वर शिंदे, प्रा. श्रुती टारे आदी उपस्थित होते. प्रा. प्रविण गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वृक्षास जल अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. प्रा. समृद्धी आमने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सरिता कोळी यांनी आभार मानले.