डांगे महाविद्यालयाचा गुणात्मक वाढीवर भर

डांगे महाविद्यालयाचा गुणात्मक वाढीवर भर

Published on

03631
हातकणंगले ः येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के. शेजारी डॉ. अण्णासाहेब डांगे, भगवानराव साळुंखे, ॲड. राजेंद्र डांगे आदी.
-------------
डांगे महाविद्यालयाचा गुणात्मक वाढीवर भर
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के; रौप्य महोत्सव वर्ष सांगता समारंभ
कबनूर, ता. १० ः अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्राधान्य दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवर भर दिला. ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजीमंत्री अण्णासाहेब डांगे होते.
महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ''वाग्यज्ञ'' या स्मरणिकेचे व ''पसायदान'' या नियतकालिकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याहस्ते झाले. माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच वंचित घटकासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात माजीमंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचे मोठे योगदान आहे.’
माजीमंत्री डॉ.अण्णासाहेब डांगे म्हणाले, ‘सामाजिक जाण व भान याची जाणीव करून देणारे शिक्षण गरजेचे आहे.’ जिल्हा परिषद माजी सदस्य अरुण इंगवले, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र डांगे, विश्वनाथ डांगे, विठ्ठलराव मुसाई, डॉ. आप्पासाहेब पुजारी, माजी प्राचार्य डी. बी. जुजारे, बापूसाहेब ठोंबरे, नूरमहंमद मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या जडणघडणीवर आधारित लघुपट सादर केला.
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. संपतराव पाटील, संस्थेचे संचालक छगनराव नांगरे, हिराताई मुसाई, अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव जुगळे, डी. बी. पिष्टे, गुंडोपंत इरकर, धोंडीराम कोरवी, शहाजान मुजावर, संदीप मोरे आदी उपस्थित होते. प्राचार्या डॉ. योजना जुगळे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रा. डॉ. सुनीता तेलसिंगे, प्रा. रवींद्र पडवळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी आभार मानले.
--------------
माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती
महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी समारंभास माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. प्रत्येक माजी विद्यार्थी आपापल्या बॅचच्या घोळक्यात स्मृतिगंधात रमून गेलेला. महाविद्यालयाचे ते मंथरलेले दिवस. वर्गातील आठवणी, शिस्तप्रिय शिक्षक, वात्सल्यमूर्ती शिक्षक या अन् अशा कितीतरी आठवणी प्रत्येक जण सांगत होता. महाविद्यालय आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.