कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांची तक्रार

कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांची तक्रार

03754
कबनूर ः येथील प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांनी सरपंच शोभा पोवार यांना निवेदन दिले.
-----------
कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांची तक्रार
कबनूर ग्रामपंचायत ः निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
कबनूर, ता. १९ ः येथील प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांनी ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांना उद्धट बोलतात, अरेरावीची भाषा करतात तसेच शिवीगाळ करतात याला पायबंद घालावा अशा आशयाचे निवेदन सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुनील काडाप्पा, ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ‘असे प्रकार अनेकदा घडले असून नागरिकांनी ज्या त्या वेळी कार्यालयाकडे तक्रार केली आहे. पण त्या कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई झाल्याचे किंवा ठोस निर्णय घेतल्याचे दिसून येत नाही. योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा याविरुद्ध आंदोलन, मोर्चा, उपोषण केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर शशिकला वड्ड, सुरैय्या मुजावर, रियाज फकीर, श्रीरंग कांबळे, संतोष मुळे, सारिका धोतरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
--------------
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत चौकशी करून ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल.
-शोभा पोवार,
सरपंच, कबनूर ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com