
कसबा सांगाव: कसबा सांगावच्या उपसरपंचपदी भाजपचे प्रवीण माळी यांची बिनविरोध निवड
01122
कसबा सांगावच्या उपसरपंचपदी
प्रवीण माळी यांची बिनविरोध निवड
कसबा सांगाव ः येथील उपसरपंचपदी समरजितसिंह घाटगे गटाचे प्रवीण दिलीप माळी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी गवंडी यांनी काम पाहिले. अध्यक्षस्थानी सरपंच ॲड. सौ. वीरश्री विक्रमसिंह जाधव होत्या. उपसरपंचपदासाठी दोन्ही आघाडींकडून अर्ज दाखल केले जातील, अशी चर्चा होती; मात्र एकमेव अर्ज आल्याने श्री. माळी यांची निवड झाली. निवड प्रक्रियेत कसबा सांगाव विकास आघाडीच्या दहा आणि विरोधी महाविकास आघाडीच्या सात सदस्यांनी सहभाग घेतला. ग्रामविकास अधिकारी आण्णासाहेब कुंभार यांनी स्वागत केले. सदस्य सुदर्शन मजले, बाळासाहेब हेगडे, दीपक हेगडे, अमर कांबळे, अरविंद माळी, रमेश हसूरे, अमर शिंदे, रेखा आवळे, गीतांजली विभूते, अनिता हेरवाडे, अनिता कांबळे, सारिका भोजे, दया माने, शबाना मुल्ला, अर्चना लोखंडे, अर्चना चव्हाण, कृषी अधिकारी प्रवीण मेथे, तलाठी दिगंबर पाटील उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामसचिवालय कार्यालय परिसरात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण झाली.