सांगाव-कागल मार्गावरील धोकादायक फांद्या हटवा

सांगाव-कागल मार्गावरील धोकादायक फांद्या हटवा

1567
कसबा सांगाव ः कसबा सांगाव ते कागल मार्गावर काशी विश्वेश्वर मंदिरासमोरील झाडांच्या धोकादायक फांद्या. (छाया : संतोष माळी)
....
सांगाव-कागल मार्गावरील
धोकादायक फांद्या हटवा

सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. ७ ः मगदूम मळामार्गे कागलकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरील झाडांच्या फांद्या धोकादायक बनल्या आहेत. काशी विश्वेश्वर मंदिरासमोरील बाजूस मोठ्या झाडांच्या अनेक फांद्या जमिनीपासून अवघ्या काही फुटांवर लोंबकळत आहेत. यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून संबंधित विभागाने फांद्या तत्काळ हटविण्याची मागणी होत आहे.
कसबा सांगाव येथून कागलकडे जाण्याचा पर्यायी आणि जवळचा मार्ग मगदूम मळा येथून जातो. हुपरी, इचलकरंजीसह अन्य गावांतील अनेक दुचाकी, चारचाकी वाहने या रस्त्यावरून जातात. विद्यार्थी वाहतुकीची वाहने याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. काशी विश्वेश्वर मंदिराजवळील वळणावर अनेक मोठी झाडे आहेत. यातील काही झाडांच्या लहान-मोठ्या फांद्या जमिनीपासून अवघ्या पाच-सहा फुटांपर्यंत लोंबकळत आहेत. या परिसरात वानरांची संख्याही जास्त आहे. जोरदार वारा आणि वानरांनी झाडावर मारलेल्या उड्या यामुळे फांद्या आणखी खाली येत आहेत. वानराने दुचाकी वाहनावर उडी मारल्याची घटनाही घडली आहे. संततधार पावसामुळे भिजलेल्या फांद्या तुटून वाहनधारकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धोकादायक स्थितीत लोंबकळनाऱ्या फांद्या तत्काळ हटविण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांतून होत आहे.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com