आईच्या नावे लावलेले झाड देईल सुखाची सावली ः चव्हाण

आईच्या नावे लावलेले झाड देईल सुखाची सावली ः चव्हाण

Published on

1200
तांबाळे (ता. भुदरगड) ः येथे कडगाव वन परिक्षेत्रामार्फत काढलेली वृक्षदिंडी.
....
आईच्या नावे लावलेले झाड
देईल सुखाची सावली ः चव्हाण

कडगाव, ता. ७ : ‘पर्यावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशा स्थितीत धरणी मातेला वाचविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड आवश्य लावावे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल,’ असे आवाहन कडगाव वनविभागाच्या वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हण यांनी केले.
तांबाळे (ता. भुदरगड) येथे कडगाव वन परिक्षेत्रामार्फत वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तांबाळेश्वर हायस्कूल, सौ. कारमेलीन हायस्कूल, विद्या मंदिर तांबाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी वनक्षेत्रपाल चव्हाण म्हणाल्या, ‘वन आणि हवामान बदल विभागाचे सचिव लीला नंदन यांनी देशात ही नवीन योजना सुरू केली आहे. भारताची लोकसंख्या १४० कोटी आहे. तेवढी झाडे लावावीत यासाठी ‘एक पेड मेरे माँ के नाम’ याला वृक्षारोपणाशी जोडलेले आहे. देशातील सर्व विभाग, स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी केले जाणार आहेत. यंदा १४० कोटी वृक्ष या माध्यमातून लावले जाणार आहेत.’
यावेळी तांबाळे, अनफ खुर्द येथील हत्ती कॅम्प येथे वड, जांभूळ प्रजातीच्या रोपांची लागण केली. वनपाल दत्तात्रय जाधव, लुडदिना डिसोजा, वनरक्षक संतोष गोजारे, दिलीप आबिटकर, कुलदीप पाटील, बाबू अढळ, अरमान नदाफ, पांडुरंग पोवार ,गणेश कदम, गणेश लोकरे, राजकुमार रिठे, भाग्यश्री घुगे, अनिकेत चव्हाण, सारिका बेगडे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.