ग्रामीण विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद ः डॉ. पाटील

ग्रामीण विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद ः डॉ. पाटील

Published on

1203
मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांचा सत्कार करताना डॉ. क्रांतिकुमार पाटील. उपस्थित मान्यवर.
.....
ग्रामीण विद्यार्थ्यांचे यश
कौतुकास्पद ः डॉ. पाटील

सकाळ वृत्तसेवा
कडगाव, ता. ८ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे उद्‍गार ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी काढले. कुमार भवन कडगाव (ता. भुदरगड) येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘कै. व्ही. टी. पाटील यांनी मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून भुदरगडसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. कडगाव येथील ही प्रशाला काकाजींचे स्मारक आहे. सलग नऊ वर्षे शंभर टक्के निकाल लावून प्रशालेने आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.’
मेंगाणे म्हणाले, ‘पालकांनी आपल्या पाल्यामधील गुणवतेचा शोध घेतला पाहिजे. कुमार भवन प्रशालेत गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे सातत्याने शंभर टक्के निकाल शक्य झाला.’
यावेळी मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांना गुरुवर्य डी. डी. आसगावकर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार झाला. एस. बी. हजारे यांनी प्रास्ताविक केले. एस. एस. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. गुरव यांनी आभार मानले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.