
कुंभीचे चौथ्या पंधरवड्याचे ३,१०० रुपये प्रमाणे ऊस बिल वर्ग ,माजी आमदार चंद्रदीप नरके
‘कुंभी’चे ऊस बिल वर्ग
कुडित्रे, ता. १३ : कुंभी - कासारी सहकारी साखर कारखान्याचे चालू गळीत हंगाम २०२२-२३ मधील एफआरपी ३,१०० रुपयेप्रमाणे चौथ्या पंधरवडयाचे गळीतास आलेल्या ७९,५०४.०७२ टन उसाची एकूण ऊस बिल रक्कम रुपये २४ कोटी ६४ लाख ६२ हजार प्रमाणे रक्कम ऊस पुरवठाधारकांचे बँक खात्यावर १३ जानेवारीला वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
चालू हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने ता. १२ अखेर ३,८३,९०० टन उसाचे गळीत करुन ४,६३,०१० क्विंटल साखर पोती उत्पादित केली. सरासरी साखर उतारा १२.१५ टक्के आहे. डिस्टिलरी व को-जन प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत. चालू हंगाम २०२२-२३ करिता गळीताचे उद्दिष्ट ७ लाख टनाचे असून ऊस उत्पादक सभासद , बिगर सभासद शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे, अशी विनंती अध्यक्ष माजी आमदार नरके यांनी केली. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक मंडळ, सदस्य आणि कार्यकारी संचालक धिरजकुमार माने उपस्थित होते.