कुंभी विरोधी शाहू पॅनेल सभा वाकरे

कुंभी विरोधी शाहू पॅनेल सभा वाकरे

Published on

03182
वाकरे ः येथे राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या सभेत बोलताना गोकुळ संचालक चेतन नरके. समोर उपस्थित जनसमुदाय.

कारखाना राजकीय अड्डा बनविला
चेतन नरके; वाकरेत कुंभी कासारी बचाव पॅनेलची सभा


कुडित्रे, ता. ८ ःपी. एन. पाटील-अरुण नरके यांची मैत्री सोन्यासारखी आहे. शब्दाला जागणारी व्यक्ती म्हणून अरुण नरके यांची ओळख आहे. त्यामुळे शरीराने एके ठिकाणी, मनाने एके ठिकाणी असे असू शकत नाही. डी.सीं.चे विचार बाजूला ठेऊन राजकारण आणले. कारखाना राजकीय अड्डा बनविला. कारखाना वाचावा म्हणून योग्य निर्णय घेतला असून, त्यात बदल नाही, असा विश्वास गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केला.
वाकरे येथे राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक माने होते.
यावेळी नरके म्हणाले, ‘अरुण नरकेंनी पुतण्यासाठी मुलाचे राजकीय जीवन संपवले. ज्यांच्या अहवालच खोटा आहे तो पारदर्शक कसला. कारखान्याचे शासकीय ऑडिट केले पाहिजे.’
राऊसो पाटील यांनी आमदार सतेज पाटील सोबत असल्याच्या अफवा पसरविल्या आत असल्याचे सांगितले. कोपार्डेचे बाजीराव दत्तू पाटील बाळासाहेब खाडे, एकनाथ पाटील, दादू कामिरे, बाजीराव खाडे, प्रकाश देसाई, राजेंद्र सूर्यवंशी, रसिका पाटील, उत्तम पाटील, सूरज पाटील यांची भाषणे झाली. भगवान पाटील, जयसिंग पाटील, संभाजी पाटील, आर.डी.पाटील, विठ्ठल तोरस्कर, हिंदुराव तोडकर, विजय पोवार, सागर सूर्यवंशी उपस्थित होते. प्रा. वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.